Last Updated: Saturday, May 4, 2013, 18:37
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आयआयटी मुंबईला प्रत्येकी २,२६३ रुपयांना आकाश टॅबलेट दिल्यानंतर आता याच टॅबलेटचं अपडेट रुप दाखल होणार आहे. ‘डाटाविंड’ या आकाशच्या निर्मात्या कंपनीनं हा अपडेट स्वरुपातला टॅबलेट २,५०० रुपयांपर्यंत देण्यास तयारी दर्शवलीय.
डाटाविंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी ही माहिती दिलीय. ‘माझ्या माहितीप्रमाणे आकाशच्या अपडेट स्वरुपासाठी कंपनीला प्रत्येकी २,५०० रुपये अपेक्षित किंमत आहे. आम्ही प्रत्येक १० लाख टॅबलेटची ऑर्डर या किंमतीवर देण्यासाठी तयार आहोत’ असं त्यांनी म्हटलंय.
गेल्यावेळी आकाश टॅबलेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी झालेल्या विलंबाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तुली यांनी ‘आम्ही तर ऑर्डर एक महिना अगोदरच पूर्ण केली होती’ असं उत्तर दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘निविदेमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे आकाश टॅबलेटसच्या ऑर्डरची पूर्तता ६ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. आम्ही हे काम १ मे रोजीच पूर्ण केलंय’.
First Published: Saturday, May 4, 2013, 18:37