आकाश अपडेट स्वरुपात; केवळ २५०० रुपयांत

Last Updated: Saturday, May 4, 2013, 18:37

आयआयटी मुंबईला प्रत्येकी २,२६३ रुपयांना आकाश टॅबलेट दिल्यानंतर आता याच टॅबलेटचं अपडेट रुप दाखल होणार आहे.

`आकाश-२` टॅबलेट बाजारात

Last Updated: Sunday, November 11, 2012, 16:22

ज्याची उत्सुकता होती ती आता संपली आहे. `आकाश-२` टॅबलेट बाजारात दाखल झाला आहे. `आकाश` टॅबलेटचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले.

`आकाश` जमिनीवर कधी उतरणार?- मोदी

Last Updated: Thursday, September 6, 2012, 11:32

‘गुजरातमध्ये सत्ता मिळाल्यास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटू’ असं अश्वासन देणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी विचारलं, “एवढा गाजावाजा होत असलेलं ‘आकाश’ टॅबलेट जमिनीवर कधी उतरणार? ”

पुढच्या महिन्यात 'आकाश' उपलब्ध- सिब्बल

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 17:33

फास्ट, सुधारित व्हर्जन असणारा आणि जगातला सगळ्यात स्वस्त मानला जाणारा आकाश टॅब पुढच्या महिन्यात आपल्या हाती येणार आहे. दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी आज अशी घोषणा केली आहे.

आकाशला झाकणार 'मायक्रोमॅक्स टॅबलेट'?

Last Updated: Sunday, April 8, 2012, 17:11

आकाश टॅबलेटने गॅझेट मार्केटमध्ये बरीच उलथापालथ केली होती. पण आता आकाश टॅबलेटला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स सज्ज झाली आहे. मायक्रोमॅक्स कंपनीनेही आता आपलं टॅबलेट मार्केटमध्ये आणलं आहे.

मे महिन्यात, 'आकाश-२' हातात

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 14:06

आकाश टॅबलेटचं नवं व्हर्जन मे महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी सोमवारी सांगितलं. आकाश टॅबलेट कोणताही व्यवसायिक फायदा न पाहाता विकण्यात येणार आहे.

आकाशचे अपग्रेड व्हर्जन त्याच किंमतीत!

Last Updated: Monday, February 20, 2012, 19:11

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची सुधारीत आवृत्ती त्याच किंमतीत सरकार उपलब्ध करुन देणार आहे. आकाशची निर्मिती आता देशातच करण्यात येणार आहे.

आकाश-२ येणार 'मुठीत', एप्रिलच्या 'सुट्टीत'

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 16:32

सर्वात स्वस्त टॅबलेट लॅपटॉप 'आकाश'च्या बाबतीत डाटाविंड या कंपनीसोबत असणारा करार हा अबाधित राहणार असल्याचे सोमवारी सरकारने स्पष्ट केलं. 'आकाश- २' हे टॅबलेट या वर्षीच्या एप्रिल महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.

भविष्यात २२ कोटी आकाश टॅबलेटची गरज

Last Updated: Monday, January 16, 2012, 16:20

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशच्या २२ कोटी युनिटची गरज भासेल असं सरकारने म्हटलं आहे. शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यासाठी आकाश टॅब उपयुक्त ठरणार आहे.

'आकाश'चं नवं व्हर्जन त्याच किमतीत!

Last Updated: Saturday, January 14, 2012, 16:44

जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट पीसी असलेल्या आकाश मध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यात सुधारणा करून नवं व्हर्जन बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना चांगला आणि उत्तम दर्जाचा टॅब त्याच किमतीत मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे .

‘आकाश’ टॅबचं भविष्य अधांतरी!

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:03

आकाश टॅबलेटचे मोठा गाजावाज करून लाँचिंग केल्यानंतर आता केंद्र सरकारने जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट बनविणाऱ्या डाटाविंड या कंपनीशी पुढील काळात होणारा व्यवहार अधांतरीत ठेवला आहे. या कंपनीचे पुढील कॉन्ट्रक्ट एक्सटेंड करण्याबाबत सरकारने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

'आकाश' अयशस्वी ठरण्याची दहा महत्वाची कारणे

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:02

आकाश टॅबलेट लवकरच लाँच होणार असली तरी या टॅबच्या कार्यक्षमता आणि टिकाऊपणा बद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहेत. टॅबमधील तांत्रिक त्रुटी, एकूण किंमत यामुळे या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित उपकरणाविषयी खरेदीदारांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक आहे

इमेलद्वारा झाले मोकळे 'आकाश'

Last Updated: Thursday, January 12, 2012, 15:12

आकाश टॅबलेटची नोंदणी ज्या ग्राहकांनी केली आहे त्यांना आता आता इमेलद्वारा त्यांच्या ऑर्डरसंबंधी सर्व माहिती मिळू शकणार आहे. आकाशची निर्मिती करणाऱ्या डाटाविंडच्या supportin@datawind.com या संकेतस्थळावर इमेलद्वारा तुम्हाला तुमच्या ऑर्डरसंबंधी चौकशी करता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मुठीत 'आकाश'

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 13:41

आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खूष खबर आहे. आता महाविद्यालयाच्या वाचनालयात जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट भाड्याने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आकाशचे १५ दशलक्ष टॅबच्या विक्रीचे लक्ष्य

Last Updated: Friday, January 6, 2012, 21:46

आकाश टॅबलेटची निर्माती डाटाविंड यंदाच्या वर्षात १५ दशलक्ष टॅबची विक्री करण्याची शक्यता आहे. कंपनीला भारत सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून अल्प किंमतीतील टॅबलेटच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळवली आहे. मंत्रालय यंदाच्या वर्षात विविध कंपन्यांकडून १० दशलक्ष टॅब विकत घेणार आहे

‘आकाश’साठी पाहावी लागणार वाट!

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 22:22

www.24taas.com, नवी दिल्ली जगातील सर्वात स्वस्त टॅब असलेल्या ‘आकाश’ अपग्रेड व्हर्जनसाठी आता तुम्हांला पुढील मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आकाशचा (युबीस्लेट 7+) जानेवारी-फेब्रुवारीचा स्टॉक आत्ताच संपला असल्याने आता ग्राहकांना मार्चपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आकाशची लाखाला गवसणी

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 21:20

जगातील सगळ्यात स्वस्त टॅबलेट आकाशची ऑनलाईन बुकिंग अगदी जोरात सुरू आहे. फक्त १४ दिवसात १४ लाख बुकिंग ही ह्या टॅबलेटसाठी झाली आहे.

'आकाशा'त परत भरारी मारण्याची संधी

Last Updated: Monday, December 26, 2011, 15:28

आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी ज्यांनी गमावली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डाटाविंड कंपनीने १५ डिसेंबरला aakashtablet.com या संकेतस्थाळवर आकाशसाठी ऑनलाईन बुकिंगची सूविधा उपलब्ध करुन दिली होती. आता ज्यांना त्यावेळेस या संधीचा लाभ घेता आला नव्हता त्यांना NCarry.com. या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.

आकाश टॅबलेट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 17:27

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटचे निर्माते डाटाविंडने ३०,००० टॅबलेटची प्रत्येकी २५०० रुपये किंमतींनी ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. ऑनलाईन ऑर्डर नोंदवल्या नंतर सात दिवसात डिलिव्हरी देण्यात येणार आहे.

‘आकाशा’त भरारी मारण्याची संधी

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 12:46

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची निर्माती डाटाविंडने विद्यार्थी आणि सोशल नेटवर्किंग स्टार्टअपसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आकाशचे निर्माते डाटाविंड यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट ऍप्लिकेशन्स आकाशमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

'आकाशा'ला गवसणी

Last Updated: Thursday, November 17, 2011, 15:03

जगातील सर्वात स्वस्त ३००० रुपये किंमतीची टॅबलेट आकाशला तीन लाखाचं बुकिंग प्राप्त झालं आहे. आकाश पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. इंग्लंडच्या डाटाविंडची निर्मिती असलेलं आकाशचं सबसिडाईझ्ड मॉडेल सध्या शाळा आणि महाविद्यालांमध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहे