जनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल AAP or Anna Hazare`s fast not behind Lokpal push:

जनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल

जनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.

देशात भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपाल विधेयक गरजेचं आहे. पण प्रत्येक समस्येचं उत्तर लोकपाल नाही, असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी सीबीआयचा वापर करण्याचे अधिकार लोकपालकडे असतील, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली. तर सिब्बल यांनीही भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपाल गरजेचं असल्याचं म्हटलं.

लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत मांडण्यात आलेलं आहे. हे विधेयक आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मदत करण्याचं आवाहन यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं.

भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासाठी लोकपाल विधेयक जरुरीचं आहे. त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून ते मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन राहुल यांनी केलं. मात्र देशातील सर्व समस्यांसाठी `लोकपाल` हे एकमेव उत्तर असल्याचं आपण कधीही म्हणालो नव्हतो. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकपाल हे मोठं पाऊल आहे, असं राहुल यांनी स्पष्ट केलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 20:37


comments powered by Disqus