दिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणाAAP set to form govt in Delhi, `major announcement` today

दिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा

दिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.

आपच्या या जनमत चाचणीचा कालचा शेवटचा दिवस होता. दिल्लीकरांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठीचा अनुकूल कौल दिलाय, असं मत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

केजरीवाल आज राज्यपालांना भेटणार असल्याची शक्यता आहे. तसंच आज सकाळी ११ वाजता केजरीवाल यांची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013, 08:28


comments powered by Disqus