दिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्रीAAP to form government in Delhi, Arvind Kejriw

दिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री

दिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीत आता आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं ‘आप’नं स्पष्ट केलंय. आज आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी आपण आज नायब राज्यपालांना भेटायला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार आहे.

आपनं सत्ता स्थापन केल्यास मुख्यमंत्री कोण होणार यावर होणाऱ्या चर्चांनाही पूर्णविराम देत अरविंद केजरीवालच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री असतील, असं आपनं स्पष्ट केलंय. दिल्लीत सरकार स्थापनेबाबत ‘आप’नं जनतेकडून कौल मागवला होता. ७४ टक्के लोकांनी आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन करावी, असं म्हटल्याचं केजरीवाल म्हणाले.

२६ डिसेंबरला जंतर मंतरवर शपथविधी घ्यावा, अशी इच्छा केजरीवालांनी व्यक्त केलीय. आपचे प्रवक्ते मनीष सिसोदिया यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले, ६ लाख ९७ हजार एसएमएस ‘आप’ला आले. २५७ सभांमध्ये सरकार बनवण्यासंदर्भात होकार मिळाला. तर २३ सभांमध्ये आपनं सरकार बनवू नये, असं जनतेनं म्हटलं.

उपराज्यपालांनी आम आदमी पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. तेव्हा आप ने १० दिवसांचा वेळ मागून घेतला. आता सत्तेत आल्यावर विजेचे दर कमी करण्यासह लोकांना दिलेली इतर आश्वासन पूर्ण करण्याचं आव्हान ‘आप’ पुढं असणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013, 12:09


comments powered by Disqus