फरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’, Absconding narayan sai get bald

फरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’

फरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सध्या पोलीस कोठडीत असलेल्या आसाराम बापूचा पुत्र नारायण साई अजुनही फरार आहे. तो कुठं लपलाय हे शोधून काढण्यासाठी पोलीस जंग-जंग पछाडत आहेत. मात्र, नारायण साईनं पोलिसांपासून वाचण्यासाठी वेशांतर करून टक्कलही केल्याचा दावा एका भक्तानं केलाय.

एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे आसारामपुत्र नारायण साई यानं वेशांतर केल्याचा दावा त्याच्या एका भक्ताने केलाय. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर नारायण साईचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, नारायण साई काही अजून मिळालेला नाही. ‘साईनं वेशांतर केलंय... दाढी काढून टाकलीय... इतकंच नाही तर टक्कल केलंय’ अशी माहिती आता त्याच्या एका भक्ताने दिलीय.

नारायण साई शुक्रवारी आग्रा इथल्या घरात राहीला होता. तिथेच त्याच्या माणसांनी वेगळ्या सीमकार्डचीही व्यवस्था केली. सध्या तो गेरूच्या रंगाचे कपडे वापरत असल्याची माहिती या भक्तानं दिलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 20, 2013, 23:48


comments powered by Disqus