आसाराम बापूंच्या लाल टोपीचे रहस्य उघड

Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:01

अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या डोक्यावरील लाल टोपीचे रहस्य उलगडले आहे. ही टोपी घातली आहे ती तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी. या टोपीला अंधश्रद्धेची किनार लागली आहे. टोपीसाठी चक्क सव्वा लाख मंत्रांचा जप करण्यात आलाय.

नारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 13:50

आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.

फरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 09:25

गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.

नारायण साईचा अनौरस मुलगा; पत्नीनं दिली माहिती

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 16:08

सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण साई आणि त्याची सहकारी जमुना यांना एक मुलगा आहे. ही गोष्ट नारायण साई याची पत्नी जानकी हिच्या चौकशीतून समोर आलीय.

नारायण साई अजमेरमध्ये विवाहबद्ध...

Last Updated: Sunday, November 17, 2013, 15:56

सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात प्रकरणातील आरोपी आणि गजाआड असलेल्या आसाराम बापूचा मुलगा नारायण साई अजूनही फरारच आहे.

आसारामपुत्र नारायण साई `पलायनवादी` म्हणून घोषित

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 10:51

लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.

फरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`

Last Updated: Friday, November 8, 2013, 11:29

गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.

आसाराम बापूंचा विरार आश्रम तोडण्यास सुरूवात

Last Updated: Thursday, November 7, 2013, 15:00

विरारमध्ये आसाराम बापूंचा आश्रम तोडण्यास सुरुवात करण्यात आलीय.. तहसीलदारांनी आश्रम अनधिकृत असल्यामुळे कारवाईचे आदेश दिले आहेत. कुंभारपाडामध्ये हा आश्रम आहे.

नारायण साईच्या विरारमधील आश्रमावर पोलिसांची धाड

Last Updated: Saturday, October 26, 2013, 07:50

गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला नारायण साई याच्या विरारमधील आश्रमात बसल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरासाम बापूंच्या विरारच्या आश्रमावर काल धाड टाकली.

सुरतच्या डीसीपींना नारायण साई समर्थकाकडून जीवे मारण्याची धमकी

Last Updated: Monday, October 21, 2013, 14:48

नारायण साईंविरोधातल्या बलात्कार प्रकरणात चौकशी करत असलेल्या सुरतच्या पोलीस अधिकारी शोभा भुताडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नारायण साईंविरोधात यापुढं अधिक चौकशी कराल तर जीव गमवावा लागेल या भाषेत त्यांना धमकावण्यात आलंय.

फरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’

Last Updated: Sunday, October 20, 2013, 23:48

नारायण साईनं पोलिसांपासून वाचण्यासाठी वेशांतर करून टक्कलही केल्याचा दावा एका भक्तानं केलाय.

आसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:53

सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.

आसाराम बापूंची आता सूरत पोलिसांकडून चौकशी

Last Updated: Monday, October 14, 2013, 16:56

सूरतमध्ये दोन बहिणींनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळं आता आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साईंवरील संकट वाढतांना दिसतायेत. गुजरात पोलिसांनी आज आसाराम बापूंची जोधपूरहून अहमदाबादला रवानगी केलीय. आता अहमदाबादमध्ये पोलीस बापूंची चौकशी करेल.

फरार नारायण साई नेपाळमध्ये गेल्याची शंका

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 11:31

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई नेपाळमध्ये पळून गेल्याची बातमी आहे. त्याच्याच तपासासाठी सूरत पोलीस बिहारला रवाना झाले आहेत. पोलीस नारायण साईंच्या पासपोर्ट विषयी माहिती घेत आहेत.

नारायण साई फरार! सुरत पोलिसांची `लुकआऊट` नोटीस

Last Updated: Monday, October 7, 2013, 15:48

सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि मुलगा नारायण साई याच्यावर सुरत येथे बलात्काराचा गुन्हा् दाखल झाला आहे. नारायण साई फरार असून, परदेशात पळून जाण्यावची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरत पोलिसांनी `लुकआऊट` नोटीस काढली आहे.

आसाराम बापूंवर पुन्हा बलात्काराचा आरोप, मुलगाही अडचणीत

Last Updated: Sunday, October 6, 2013, 10:14

आसाराम बापूंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. सुरत मधील दोघा बहिणींनी आसाराम बापू आणि त्यांचा पूत्र नारायण साई यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलाय.

बापुंवर बलात्काराचा आरोप, मुलगा म्हणतो...

Last Updated: Thursday, August 29, 2013, 09:55

स्वत:ला संत म्हणवून घेणारे आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी आता त्यांचा मुलगा नारायण साई पुढे आलाय.