Last Updated: Sunday, December 16, 2012, 21:47
www.24taas.com, नवी दिल्लीसध्या पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक हे भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात मलिक यांनी दुसऱ्यांदा वादग्रस्त विधान केलं आहे. अबु जिंदाल हा भारताचाच एजंट असल्याचं त्यांनी आज म्हटलं आहे.
यापूर्वीदेखील मलिक यांनी २६/११ मुंबई हल्ला आणि बाबरी मशिदीची नासधूस या एका प्रकारच्या गोष्टी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी अबु जिंदाल हा भारताचाच एजंट असल्याचं विधान त्यांनी आता केलं आहे.
अबु जिंदाल हा भारताच्याच एक गुप्तचर खात्याचाच एजंट असल्याचं रहमान मलिक यांनी म्हटलं आहे. मात्र ही माहिती त्यांना कुणी दिली, याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. अबू जिंदालला सौदी अरेबियातून भारतात आणण्यात आलं होतं. यापूर्वी अबू जिंदाल सौदी अरेबियातील कैदेत होता. अबु जिंदालविषयी मलिक यांनी केलेल्या विधानाचा भारताने स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे.
First Published: Sunday, December 16, 2012, 21:47