एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला, Acid attack on girls to get married in a fixed

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला
www.24taas.com, झी मीडिया, लुधियाना

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला करण्यात आला. यात वधू महिला गंभीर जखमी झालेय. लग्नाच्या काही वेळा अगोदर वधू मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली असता त्या ठिकाणी तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले.

२२ वर्षीय वधू ही बरनाल येथे राहते. नववधूला ताबडतोब डीएमसी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या तिची तब्बेत स्थिर आहे. लुधियानाचे पोलीस आयुक्त एन एस ढिल्लोनी यांनी सांगितले, २५ वर्षीय आरोपी हा ब्युटी पार्लरच्या बाहेर होता. त्यावेळी त्यांने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो मोटर सायकलवरुन पळून गेला.

जखमी मुलीच्या घरच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीही हा बरनालाच राहणारा आहे. तो जखमी मुलीला फोन करुन धमक्की देत होता. तू माझा बरोबर लग्न कर नाही तर त्यांचे परिणाम भोगायला तयार राहा. पोलिसाच्या माहितीनुसार हा आरोपी पिडीत मुलीच्या मैत्रणीचा भाऊ आहे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसानी एक तुकडी बरनाल येथे गेली आहे. या हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

First Published: Saturday, December 7, 2013, 22:25


comments powered by Disqus