अभिनेत्री श्वेता मेननशी काँग्रेस खासदाराने केली छेडछाड!, Actress Shweta Menon`s molestation by Congress MP!

अभिनेत्री श्वेता मेननशी काँग्रेस खासदाराने केली छेडछाड!

अभिनेत्री श्वेता मेननशी काँग्रेस खासदाराने केली छेडछाड!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्लम

मल्याळम सिनेअभिनेत्री श्वेता मेनन हिच्यासोबत काँग्रेस खासदार एन. पितांबर कुरूप यांनी केलेल्या छेडछाडीसंदर्भात श्वेता मेनन केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना पत्र लिहून तक्रार करणार आहे.

एक स्त्री म्हणून मला घडलेला प्रकार अत्यंत अपमानास्पद वाटतो. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. असं श्वेता मेननने जाहीर केलं. फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी तसंच महिला संघटनांनीही घडल्या प्रकाराचा निषेध केला आहे. खासदार एन. पितांबर कुरूप यांनी मात्र असं काहीच घडलं नसल्याचा दावा केला आहे.

प्रेसिडेंट ट्रॉफी नौका रेसिंग सोहळ्यात अभिनेत्री श्वेता मेननशी छेडछाड झाली होती. मीडिया फुटेजमध्ये खासदार एन. पितांबर कुरूप श्वेता मेननच्या जवळ सरकत गेलेले आणि तिला स्पर्श करत असल्याचं दिसलं होतं. एन. पितांबर यांनी मात्र हे संपूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 17:37


comments powered by Disqus