पत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्नAfter Wife and 2 child`s murder he attempted suicides

पत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न
www.24taas.com, झी मीडिया, राजगढ/पंजाब

हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.

जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीला रेवाडीच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आयसीयूत ठेवण्यात आलंय. सध्या त्याची स्थिती गंभीर असून पोलीस या तिहेरी हत्याकांडाचा तपास करतायेत. जखमी आरोपीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यानं हे दृष्कृत्य अंधश्रद्धेतून केलंय.

जखमी आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार मनोज तिरुपती बालाजीचा भक्त आहे. त्याच्या स्वप्नात मारुतीरायानं दर्शन दिलं होतं आणि त्याला सांगितलं की त्याचं आयुष्य केवळ एक महिनाच आहे. आपल्या मृत्यूनंतर कुटुंबाचं काय होणार या भीतीनं त्यानं त्याच्या २३ वर्षीय बायकोसह एक २ वर्षाचा आणि १० महिन्याच्या लहान मुलाला चाकूनं भोसकून मारुन टाकलं. आपल्या कुटुंबाला मारल्यानंतर त्यानं स्वत:ही पोटात चाकू भोसकून मारुन घेतलं. त्याच्या बायकोच्या आणि मुलाचं इथल्या रेवाडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम करण्यात आलं.

या हत्याकांडासाठी मनोजनं एक दिवस आधी चाकू विकत घेतला होता. राजगड गावचा मनोज कुमार रहिवासी होता आणि मानेसर इथल्या खाजगी कंपनीत तो काम करत होता. शुक्रवारी रात्री त्यानं बायको सरिता, २ वर्षाची मुलगी मधू आणि १० महिन्याचा मुलगा अन्नू यांची हत्या केली. हत्येच्या वेळी घरात इतर कोणीही नव्हतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 1, 2013, 22:19


comments powered by Disqus