Last Updated: Monday, December 30, 2013, 10:01
www.24taas.com, झी मीडिया, छत्तीसगड ऐश्वर्या राय-बच्चन ही मुंबईत नाही तर छत्तीसगडमध्ये राहतेय... आणि सध्या ऐश्वर्याचं वय आहे केवळ २३ वर्ष... तुम्ही म्हणाल, भलतंच काय? पण, हे आम्ही नाही तर मतदार यादी सांगतेय.
छत्तीसगडच्या पातालगाव विधानसभा क्षेत्रातील घुघरी गावातील मतदार यादीवर नजर टाकली तर ही काय भानगड आहे, ते तुमच्या सहज लक्षात येईल. या यादीत ऐश्वर्या राय हिचं फोटोसहीत नाव छापलेलं आहे... या यादीनुसार ऐश्वर्या राय छत्तीसगड राज्यातील जाशपूर जिल्ह्यातील मूळ निवासी आहे.
जाशपूरचे जिल्हाधिकारी एलएस केन याच्या म्हणण्यानुसार, बीग बी अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेता अभिषेक बच्चन याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचं नाव पाताळगाव विधानसभा क्षेत्रातील घुघरी गावातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे... आणि ही ऐश्वर्याची जुडवा बहिण वगैरे नाही तर खुद्द ऐश्वर्याच आहे. मतदाता केंद्र संख्या क्र. १५ च्या मतदार सूचीनुसार ऐश्वर्या राय २३ वर्षांची आहे... आणि ती घुघरी गावातील घर क्र. ३७६ मध्ये राहते... आणि तिच्या कथित वडिलांचं नाव आहे दिनेश राय.
केन यांच्या म्हणण्यानुसार, अशा नावाची कोणतीही व्यक्ती या भागात राहत नाही. यासंबंधी उपविभागीय मॅजिस्ट्रेटला या प्रकरणाच्या चौकशीचे आणि १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेलेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मते, प्राथमिकदृष्ट्या हा कुणाचा तरी खोडसाळपणा दिसतोय.
आता, २०१४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तुम्हीच समजा तुम्हाला काय समजून घ्यायचंय ते...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 30, 2013, 10:01