Last Updated: Tuesday, January 14, 2014, 10:38
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीमध्ये काँग्रेस सरकारनं मल्टिब्रॅन्ड रिटेल म्हणजेच किराणा व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी घेतलेले निर्णय दिल्लीत सत्ता स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांतच रद्द केले.
या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला आप सरकारचा विरोध आहे. त्यासाठी सरकारनचं पाठिंब्याचं पत्र मागे घेत असल्याचं केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाला कळवलंय.
आम आदमी पार्टीनं आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये किराणा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीस मान्यता न देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचीच अंमलबजावणी करण्यात आली.
या निर्णयाबद्दल उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त केलीय. हा निर्णय दुर्देवी असून थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्यामुळे आटण्याची भीती व्यक्त होतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 10:38