अण्णांची प्रकृती पुन्हा ढासळली; आयसीयूमध्ये दाखल, anna hazare in icu at gudgaon

अण्णांची प्रकृती पुन्हा ढासळली; आयसीयूमध्ये दाखल

अण्णांची प्रकृती पुन्हा ढासळली; आयसीयूमध्ये दाखल
www.24taas.com, नवी दिल्ली

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना शुक्रवारी गुडगावमधल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हे वृत्त समजल्यानंतर अण्णांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या ७५ वर्षीय किरण बेदी यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. गुडगावमधल्या मेदांता मेडिसिटी हॉस्पीटलमध्ये अण्णा हजारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
‘अण्णांना सध्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आलंय. हॉस्पीटलमध्ये अण्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम प्रयत्न करतेय’ अशी माहिती किरण बेदी यांनी ट्विटरवर दिलीय.

अण्णांचे समर्थक आणि आद आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. अण्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केलीय.

First Published: Friday, December 7, 2012, 13:36


comments powered by Disqus