Last Updated: Saturday, December 1, 2012, 19:06
www.24taas.com, भुवनेश्वरअण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी आपले मार्ग बदलले असले आणि अण्णा समर्थकांनी केजरीवालांवर हल्लाबोल केला असला तरीही अण्णांचा केजरीवाल यांच्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचं दिसत आहे. कारण, अण्णांनी आपण स्वतः केजरीवाल यांनी उभ्य़ा केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करू, असं जाहीर केलं आहे.
आज पत्रकारांशी बोलताना ७५ वर्षीय अण्णांनी जाती-धर्मावर आधारीत राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. इलेक्शन फंडसाठी पैसे कमावण्यासाठी अनुचित मार्गांचा वापर होत असल्याचंही यावेळी अण्णा म्हणाले.
मात्र यावेळी सर्व राजकीय पक्षांवर ताशेरे ओढणाऱ्या अण्णांनी केजरीवाल यांना क्लीन चीट दी आहे. “मी केजरीवाल यांना चांगलंच ओळखतो. त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही. ते प्रत्येक काम देशाच्या हितासाठीच करतात. त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांची मी स्वतः तपासणी करून त्यांचा प्रचार करीन” असं अण्णा यावेळी म्हणाले.
First Published: Saturday, December 1, 2012, 19:06