Last Updated: Sunday, September 30, 2012, 07:39
www.24taas.com, राळेगणसिद्धीअरविंद केजरीवाल यांनी टीम अण्णा फोडली ? अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय? अण्णांना कुणी धोका दिलाय ? हे प्रश्न पडण्याचं कारण आहे अण्णांचा नवा ब्लॅग... या ब्लॉगमध्ये अण्णांनी टीम अण्णा का फुटली याची कारण सांगितली आहेत.
अण्णा म्हणातात राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या बाजूने मी कधीच नव्हतो. राजकीय पक्ष स्थापन केलेल्या लोकांमुळेच भ्रष्टाचारविरोधी टीममध्ये फूट पडली. पक्ष स्थापन करण्यास माझा विरोध असतानाही पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ब्लॉगमध्ये अण्णांनी अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा थेट केजरीवाल यांच्यावरच आहे. कारण राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनीच पुढाकार घेतला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या महत्वाकांक्षेमुळेच भ्रष्टाचारविरोधातली टीम फुटली असा अप्रत्यक्ष आरोप अण्णांनी केलाय. केजरीवाल यांनी आपलं नाव किंवा फोटो वापरु नये असं अण्णांनी याआधीच सांगितलं होतं. तसंच यापुढे कोणत्याही कारणासाठी उपोषण करणार नसल्याचंही अण्णांनी स्पष्ट केलंय. आंदोलन करुनच मागण्या पदरात पाडून घेऊ असंही अण्णा म्हणाले.
First Published: Sunday, September 30, 2012, 07:39