Last Updated: Thursday, March 6, 2014, 16:00
www.24taas.com, वृत्तसंस्था, फैजाबादघराचा दरवाजा उघडला नाही म्हणून एका जवानानं पत्नीसह दोघा मुलांची गोळी झाडून हत्या केल्याची घटना अयोध्या इथं घडली. आपल्या कुटुंबाची हत्या केल्यानंतर जवानानंही आत्महत्या केलीय.
अयोध्या इथं राहणारा रमेश सिंह हा भारतीय सैन्याच्या चंदीगढ तुकडीत कार्यरत होता. बुधवारी रमेश सिंह रजा घेऊन परतला. घरी आल्यावर रमेशनं दरवाजा ठोठावला पण त्याच्या पत्नीनं दरवाजा उघडला नाही. पत्नी दरवाजा उघडण्यास विलंब करत असल्यानं रमेश संतापला आणि त्यानं संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन घरात प्रवेश केला.
काही वेळानंतर स्थानिकांना घरात गोळ्या झाडण्याचा आवाज आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना घरात रमेश (वय ४०), त्याची पत्नी कुसुम (वय २६), मुलगी रिया (वय ७) आणि मुलगा शिशू (५) या चौघांचे मृतदेह आढळले आहे. पत्नी आणि मुलांची गोळ्या झा़डून हत्या केल्यावर रमेशनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 6, 2014, 15:24