अयोध्या वादग्रस्त वास्तू : कोब्रा पोस्टचा गौप्यस्फोट

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:03

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्याबाबत कोब्रा पोस्टनं गौप्यस्फोट केलाय. सुनियोजित पद्धतीने ही वास्तू पाडण्यात आल्याचा दावा कोब्रा पोस्टनं केलाय.

मोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक

Last Updated: Thursday, March 27, 2014, 16:57

उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.

दरवाजा उघडला नाही म्हणून बायको, मुलांना संपवलं

Last Updated: Thursday, March 6, 2014, 16:00

घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून एका जवानानं पत्नीसह दोघा मुलांची गोळी झाडून हत्या केल्याची घटना अयोध्या इथं घडली. आपल्या कुटुंबाची हत्या केल्यानंतर जवानानंही आत्महत्या केलीय.

अयोध्येत महाशौचालय बनवणार का - जयराम रमेश

Last Updated: Thursday, October 3, 2013, 18:47

देवालयापेक्षा जास्त महत्त्व सध्या शौचालयांना दिलं जावं, या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक

Last Updated: Sunday, August 25, 2013, 11:07

विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक करण्यात आलीय. परिक्रमा यात्रेसाठी ते फैजाबादला जाण्यासाठी निघाले असता अमौसी विमानतळावर अटक केली. त्याआधी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत असतांना “या देशात हिंदू असणं हा गुन्हा आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला होता.

अयोध्येत घमासान? प्रवीण तोगडियांना अटक

Last Updated: Sunday, August 25, 2013, 10:25

विश्व हिंदू परिषदेनं पुकारलेली परिक्रमा यात्रा आज रोखल्या, उद्यापासून देशभरात आंदोलन करण्याचा,इशारा विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी दिलाय. तर प्रवीण तोगडिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळं अयोध्येत आज पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे.

राम मंदिर बांधणारच- अमित शहा

Last Updated: Saturday, July 6, 2013, 16:40

निवडणूक जवळ येताच रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपने पुढे आणला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभं करण्याचा मुद्दा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी मांडला आहे.

आजही... हिंदूंचा `शौर्य दिन` तर मुस्लिमांचा `काळा दिन`

Last Updated: Thursday, December 6, 2012, 10:55

अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.

'बाबरी मशिदीची एक इंचही जागा मुस्लिम समाज सोडणार नाही'

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 09:41

बाबरी मशिद वादावर भाष्य करून मजलिस-ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असादुद्दिन ओवैसी यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. आयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीची एक इंच जागाही मुस्लिम समाज सोडणार नाही असा दावा ओवैसी यांनी केला आहे.