लष्करी जवानाचा गोळीबार, पाच जणांची हत्या, Army jawan shoots dead 5 colleagues at J&K camp, then self

लष्करी जवानाचा गोळीबार, पाच सहकाऱ्यांची हत्या

लष्करी जवानाचा गोळीबार, पाच सहकाऱ्यांची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, जम्मू

जम्मू काश्मीरमधील गंदेबाल जिल्ह्यातील एका लष्करी जवानाने पाच सहकारी जवानांची गोळीबार करून हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

गंदेरबाल जिल्ह्यातील मानसबल येथे असलेल्या १३ राष्ट्रीय रायफल्सच्या कँम्पमध्ये ही घटना घडलीये. या घटनेची लष्कराच्या न्यायालयाकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

गेल्या २४ वर्षांमध्ये सुरक्षा रक्षक यांच्यात तणाव दिसून येत आहे. प्रतिकुल परिस्थितीचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. घरापासून दूर तसेच मनोरंजन साधनांचा अभाव यामुळे जवानांमध्ये तणाव असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून ते टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले जात आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 10:55


comments powered by Disqus