बारामुल्ला सरकारी शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 19:14

उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता.

लष्करी जवानाचा गोळीबार, पाच सहकाऱ्यांची हत्या

Last Updated: Thursday, February 27, 2014, 11:00

जम्मू काश्मीरमधील गंदेबाल जिल्ह्यातील एका लष्करी जवानाने पाच सहकारी जवानांची गोळीबार करून हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

ओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 12:12

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.

दहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 17:23

जम्मू काश्मीरच्या विमानतळांसह काही महत्त्वाच्या ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी बऱ्याच स्थानांवर दहशतवादी कारवाया करण्याची योजना असल्याचा खुलासा दहशतवाद्यांनी केला आहे.

... तर `हिंदू राष्ट्रवादी` मोदींना निवडणुकीस मज्जाव!

Last Updated: Saturday, October 12, 2013, 22:02

स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेद्वार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीर हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.

काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

Last Updated: Thursday, October 3, 2013, 14:16

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:56

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...

किश्तवाड हिंसाचार : आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या -SC

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:09

किश्तवाड हिंसाचार प्रकरणी आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांना दिलेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलली याची विचारणा कोर्टानं केलीये. जे ऍण्ड के पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टानं हे आदेश दिलेत.

जम्मू काश्मीर पुन्हा हादरलं

Last Updated: Saturday, August 3, 2013, 11:49

जम्मू काश्मीर पुन्हा हादरलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेत. काल रात्री ३ च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसलेत.

दारुचा ब्रॅन्ड लोगो लपवण्यासाठी जर्सीवर चिकटपट्टी

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:10

आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिलाच क्रिकेटर परवेज रसूलनं आपल्या जर्सीवर दारूच्या ब्रॅन्डचा लोगो लावण्यास नकार दिलाय.

अब्दुल्लांनी मागितली सनाउल्लाहच्या कुटुंबीयांची माफी

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:52

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.

यापुढे गाणं बंद, पण आम्हाला एकटं सोडा - प्रगाश

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 13:17

श्रीनगरच्या एकमेव मुलींच्या रॉक बॅन्डनं आता यापुढे कधीच गाणं न गाण्याचा निर्णय घेतलाय. सध्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या मुलींनी कट्टर धर्मियांच्या धमक्यांपुढे नमतं घेत ‘आम्ही यापुढे कधीच गाणार नाही पण आम्हाला एकटं सोडा’ अशी विनवणी केलीय.

कंदाहार विमान अपहरण : दहशतवाद्याला अटक

Last Updated: Thursday, September 13, 2012, 13:44

जम्मू काश्मीर पोलिसांनी कंदाहार अपहरणाशी संबंधित दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी मेह्राजुद्दिन दांड उर्फ जावेदला किश्तवाड येथून अटक केली.

हिंदूकुशमध्ये भूकंप, जम्मू-काश्मिरला हादरे

Last Updated: Thursday, July 19, 2012, 15:56

आठवड्याभरात आज दुसऱ्यांदा हिंदुकुश प्रदेशात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे अफगाणिस्तानचा प्रदेश सर्वाधिक हादरला.

कोंकण रेल्वेची 'हिमालय' झेप

Last Updated: Saturday, June 16, 2012, 16:14

सह्याद्रीत यशस्विरीत्या रेल्वेमार्ग उभारण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. कोकण रेल्वेनं थेट हिमालयाएवढी झेप घेत जम्मू-काश्मीरला जोडणारा रेल्वेमार्ग उभारण्याची जबाबदारी स्विकारलीय.

काश्मीरमध्ये 'तुफान' तडाखा

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 15:58

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा एक बळी गेला असून दोघे जण बेपत्ता आहेत. तसेच हिमकडा कोसल्याने पाच जण फसल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. खोऱ्यात वादळ कायम असल्याने शाळांना सुटी जाहीर कऱण्यात आली आहे.

अमेरिका म्हणे भारताला 'माझी चूक झाली'

Last Updated: Thursday, January 5, 2012, 21:36

वेबसाईटवर आधी झळकलेल्या नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. यावर भारताने आक्षेप घेतल्यानंतर विदेश मंत्रालयाने हा नकाशा काढून टाकला.

वेश्याव्यवसाय प्रकऱणी अभिनेत्रीला अटक

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:38

'कसोटी जिंदगी की' या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय. दिवसाला अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं रात्रीच्या अंधारात अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं.

काश्‍मीर हे भारताचं अविभाज्य अंग - अण्णा

Last Updated: Friday, October 14, 2011, 11:37

प्रशांत भूषण यांनी काश्‍मीरप्रश्‍नी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून, काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, असे अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सांगितले.

हे बोलणं बरं नव्हं....

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:03

मधु चव्हाण
ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रकरणी केलेले वक्तव्य देशभरातील युवकांच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. परंतु प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी करत आहेत.