लोकपालसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देईन, Arvind Kejriwal adamant, threatens to resign if Jan Lok

लोकपालसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देईन...

लोकपालसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देईन...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा जनलोकपालच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय.

`जनलोकपाल विधेयक मंजूर झालं नाही तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ` असं केजरीवाल म्हणालेत. काँग्रेसनं साथ दिली नाही तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांनी हे विधान केलंय.

`मी मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही. दुसऱ्यांदा निवडणुका झाल्या तर आम आदमी पार्टी बहुमतानं निवडणुन येईल` असंही त्यांनी म्हटलंय.

जनलोकपाल मसुद्यातील काही मुद्यांना काँग्रेस आणि भाजपचा विरोध आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेतं हे पाहणं उत्सुकतेचं आहे.






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 9, 2014, 23:32


comments powered by Disqus