Last Updated: Tuesday, March 11, 2014, 10:07
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एक व्हिडिओनं यूट्यूबवर सध्या खळबळ उडवून दिलीय. या व्हिडिओनंतर केजरीवाल `मीडिया फिक्सिंग` प्रकरणात अडकले आहेत.
अरविंद केजरीवाल एका चॅनलला मुलाखत देत असतानाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी ते चॅनलच्या अँकरला आपल्या काही वक्तव्यांवर विशेष जोर देण्यासाठी सांगताना दिसत आहेत.
जवळजवळ एका मिनिटाच्या या व्हिडिओत केजरीवाल न्यूज अँकरशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये केजरीवाल म्हणतात, `कृपया, तुम्ही याला थोडं जास्त चालवा`. यावर अँकर म्हणतो, `हो, हो जरूर आम्ही यावर चांगलाच जोर देऊ. भगत सिंह यांच्यावर केलेली टिप्पणी चांगली आहे. आम्हाला यावर भरपूर प्रतिक्रिया मिळतील`.
केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरचा हा व्हिडिओ असावा, असं म्हटलं जातंय.
व्हिडिओ पाहा- •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 23:41