Last Updated: Saturday, January 4, 2014, 11:46
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर घेण्याचे नाकारले आहे. आपण छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाला तसे कळविले आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
सरकारने देऊ केलेल्या प्रत्येकी पाच खोल्यांच्या दोन सदनिका घेण्यास केजरीवाल यांनी तयारी केली होती. केजरीवाल यांच्या मतदारसंघातच हे घर होते. पाच खोल्यांचे डुप्लेक्स घर स्वीकारणार असल्याने वाद निर्माण झाला होता. नव्या घरावरून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे त्यांनी हे घऱ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आपण आम आदमी आहे. त्यामुळे मी छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणालेत.
माझ्या नव्या घरावरून खूप वाद निर्माण झाले आहेत. माझ्या समर्थक आणि मित्रांकडून मला याबाबत अनेक फोन आणि एसएमएस आलेत. त्यामुळे मी नव्या घरात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात मी दुसरे छोटे घर देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती मीडियाला दिली.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यापासून कौशांबी येथील आपल्या निवासस्थानामधून काम करणारे केजरीवाल लवकरच या नव्या घरात राहायला जाणार असल्याने वाद सुरू झाला होता. आता छोटे घर मिळेपर्यंत मी माझ्या घरातून कामकाज करीन असे केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, केजरीवाल यांचे घर २२ किमी लांब आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल वगळता त्यांच्या इतर मंत्र्यांना टोयोटा इनोव्हा या गाड्या सरकारतर्फे वापरण्याकरता देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी बहुतेक मंत्री याच गाड्यांमधून विधानसभेत आले. इतके दिवस मेट्रो, रिक्षा, बस अशा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करत होते. याबाबत टीका झाल्यानंतर केजरीवाल म्हणालेत, आम्ही सरकारी गाड्या वापरणार नसल्याचे कधीही म्हटले नव्हते, लाल दिव्याच्या गाड्या वापरणार नाही, असे आम्ही म्हणालो होतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 4, 2014, 11:39