अरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावरArvind Kejriwal gets Z category security in Uttar Pr

अरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर

अरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आपल्या ‘झाडू’नं भ्रष्टाचाराला साफ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आयबी अर्थात गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं आता केजरीवालांच्या भोवती सुरक्षा वाढविण्याची तयारी सुरू आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार केजरीवालांना माफियाकडून धोका आहे. विशेष म्हणजे पाणी आणि टेंडर माफियाकडून हा धोका असल्याचं कळतंय. अरविंद केजरीवाल यांनी पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिलेला असल्यानं पोलिसांपुढं पेच निर्माण झालाय.

सध्या केजरीवालांना त्यांच्या नकळत सुरक्षा पुरवली जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या अवतीभवती पोलिसांचा गराडा दिसत नसला, तरी ठरावीक अंतरावर चोख बंदोबस्त असतो. त्यासाठी `झेड` सुरक्षेपेक्षाही जास्त पोलीसबळाचा वापर होतोय. असं असताना, आता केजरीवालांच्या सुरक्षेसाठी आणखी पोलीसबळ तैनात करावं लागणार आहे आणि हे पोलिसांसाठी जिकीरीचं ठरणार आहे.

अरविंद केजरीवाल एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत असल्यानं संघटित गुन्हेगारांचं धाबं दणाणलं आहे. आपलं अस्तित्व संपण्याची चिन्हं त्यांना दिसू लागली आहेत. या चिंतेतूनच ते केजरीवालांवर प्राणघातक हल्ला करू शकतात, असा इशारा आयबीनं दिला आहे.

त्यामुळंच आता गाझियाबाद पोलिसांनी अरविंद केजरीवालांची सुरक्षा वाढवत, ती झेड सिक्युरिटीच्या धर्तीवर केलीय. जवळपास ३० सुरक्षा अधिकारी केजरीवालांच्या अवती-भोवती असणार आहेत. तर केजरीवालांनी सुरक्षा घ्यावी अशी मागणी आता आपचे कार्यकर्ते करतायेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 13, 2014, 11:50


comments powered by Disqus