आम्ही नेहमीच अण्णांसोबत - अरविंद केजरीवाल, arvind kejriwal meet anna hajare at delhi

आम्ही नेहमीच अण्णांसोबत - अरविंद केजरीवाल

आम्ही नेहमीच अण्णांसोबत - अरविंद केजरीवाल
www.24taas.com, नवी दिल्ली
आज दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी भेट घेतली. अण्णा सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राजकीय पक्षाच्या मुद्द्यावर मतभेद झाल्यानंतर अण्णा आता नवीन संघटना संघटना उभारण्याच्या तयारीत आहेत. तर केजरीवाल राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मुद्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अण्णांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जातेय.

अण्णांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे आणि आमच्यामध्ये कोणताही वाद-विवाद किंवा मनमिटाव नसल्याचं म्हटलंय. ‘अण्णा जे काही करतील त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत नेहमीच असू... प्रत्येक निर्णयात आम्ही अण्णांची साथ देणार... अण्णांसोबत आमचे संबंध अजूनही चांगले आहेत आणि आम्ही त्यांच्याशी यानंतरही संपर्कात असणार आहोत... जेव्हा अण्णांना आमची गरज असेल तेव्हा आम्ही उपस्थित राहू... आमचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय मात्र एकच आहे’ असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

राजकीय पक्षासंबंधी घोषणा २६ नोव्हेंबर रोजी करणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिलीय.

First Published: Monday, October 1, 2012, 13:53


comments powered by Disqus