केजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा, arvind kejriwal resigns

केजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा

केजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक न मांडता आल्यानं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविलाय. पीटीआयनं हे वृत्त दिलंय. केजरीवाल यांनी या निर्णयाची आता औपचारिक घोषणा केलीय.

कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता अरविंद केजरीवाल उपराष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. अवघ्या ४९ दिवसांत केजरीवाल सत्तेवरून पायउतार झालेत... त्यामुळे दिल्लीत लोकसभा-विधानसभा निवडणुका आता एकत्रच होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.


काय म्हणाले केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या कॅबिनेट बैठकीनंतर आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपण राजीनामा दिल्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी, राजीनाम्याचा निर्णय हा मंत्र्यांशी चर्चा करूनच घेतलाय...' असं त्यांनी स्पष्ट केलंय.

'भाजप-काँग्रेसनं देशाला लाज आणलीय... आम्ही मुकेश अंबानींविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानं विरोध केला जातोय. पण, भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये पाठवणं म्हणजेच गव्हर्नन्स' असं म्हणत आम्ही देशासाठी प्राणही द्यायला तयार आहोत असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

'आम्ही कोणतीही असंविधानिक गोष्ट केली नाही. दिल्लीत विधानसभेला तर काहीही महत्त्व दिलं जात नाही...पण, आम्ही केंद्र सरकारला मानत नाही... आम्ही केवळ संविधानालाच मानतो... जनताच या भाजप-काँग्रेसला धडा शिकवणार' असं म्हणत केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 20:22


comments powered by Disqus