Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:01
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीअध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या डोक्यावरील लाल टोपीचे रहस्य उलगडले आहे. ही टोपी घातली आहे ती तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी. या टोपीला अंधश्रद्धेची किनार लागली आहे. टोपीसाठी चक्क सव्वा लाख मंत्रांचा जप करण्यात आलाय.
सूरत आणि जोधपूर आश्रमातील दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापू गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. लैंगिक अत्याराच्या आरोपांमुळे आसाराम बापू अटकेत आहे. असे असताना बापूंच्या डोक्यावर लाल रंगाची टोपी दिसते. या टोपीचे रहस्य काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती. आज त्याचा उलगडा झालाय.
आसाराम बापूच्या टोपीचे रहस्य त्यांच्याच एका माजी सेवकाने उलगडले आहे. राहुल सचान हा बापूंचा माजी सेवक आहे. त्यानेच बापूचे भांडाफोड केली आहे. आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई या दोघांचा काळ्या जादूवर विश्वास आहे. या अंधश्रद्धेपायी दोघांनी कोट्यवधी रुपये उधळले आहेत.
अंधश्रद्धेपायीच आसाराम बापू आणि नारायण साई हे लाल टोपी तसेच डोळ्यात काजळ लावतात. काळ्या जादूच्या आधारेच तुरुंगातून बाहेर पडू असे या दोघांची भावना आहे. आपल्याला कोणाची नजर लागू नये म्हणून ते काजळ घालत असल्याचे त्यांचा सेवक सांगतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 19, 2013, 23:01