Last Updated: Wednesday, August 29, 2012, 23:35
www.24taas.com, गोध्रा, गुजरात आसाराम बापूंच्या हेलिकॉप्टरला बुधवारी जबरदस्त अपघात झाला. मात्र, या जीवघेण्या अपघातातून आसाराम बापू थोडक्यात बचावले. ते सुरक्षित आहेत.
गुजरातच्या गोध्रामध्ये हेलिकॉप्टर उतरवत असताना हा अपघात घडला. या अपघातात हेलिकॉप्टरचा पायलट जखमी झालाय. इथल्या गोधरा विज्ञान महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर हे हेलिकॉप्टर उतरत होतं. एका सत्संग कार्यक्रमासाठी ते तेथे गेले होते. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचे जवळपास तीन तुकडे झाले. हेलिकॉप्टर उतरविताना अडथळे आल्याने हा अपघात झाला, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
First Published: Wednesday, August 29, 2012, 23:35