Last Updated: Saturday, August 31, 2013, 10:29
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीअध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांना अटक होण्याची शक्यता आहे. राजस्थानातल्या जोधपूरच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पीडित मुलीनं याप्रकरणी दिल्लीत तक्रार केली होती. नंतर ती तक्रार जोधपूरला वर्ग करण्यात आली. जोधपूर न्यायालयानं शरण येण्याची दिलेली मुदत काल संपल्यानं आसाराम बापू यांना अटक होण्याची शक्यता आहे.
आसाराम बापू सध्या इंदौरमध्ये आहेत. आपल्याला अडकवण्यामागे सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांचा हात असल्याची आगपाखड आसाराम बापूंनी केलीये.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 31, 2013, 10:29