Last Updated: Monday, October 14, 2013, 16:56
www.24taas.com, वृत्तसंस्था, जोधपूरसूरतमध्ये दोन बहिणींनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळं आता आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साईंवरील संकट वाढतांना दिसतायेत. गुजरात पोलिसांनी आज आसाराम बापूंची जोधपूरहून अहमदाबादला रवानगी केलीय. आता अहमदाबादमध्ये पोलीस बापूंची चौकशी करेल.
याबाबतच आसाराम बापूंना आपल्या ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलीस जोधपुरला पोहोचली. दोन दिवसांपूर्वी जोधपूर कोर्टानं आसाराम बापूंना ताब्यात घेण्यासंदर्भात गुजरात पोलिसांना मंजुरी दिली. आता गुजरात पोलीस दोन बहिणींवरील बलात्कार प्रकरणी आसाराम बापूंची चौकशी करेल. तर नारायण साईनं सूरतच्या कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलाय.
ज्या अल्पवयीन मुलीनं जोधपूरमध्ये आसाराम बापूंच्या विरोधात बलात्काराचा आरोप लावला होता, तिचे वकील मनीष व्यास म्हणाले, की कोर्टानं आसाराम बापूंना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासंदर्भात गुजरात पोलिसांना मंजुरी दिलीय. मात्र २५ ऑक्टोबरला जोधपूर कोर्टात आसाराम बापूंना हजर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आसाराम बापूंसह चौघांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आलीय.
दरम्यान, आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईनं सूरतच्या कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलाय. नारायण साई विरोधात गुजरात पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावलीय. सूरत पोलिसांनी नुकतीच दोन बहिणींची तक्रार नोंदवून घेतली.
यात आसाराम बापू आणि नारायण साईंवर बलात्कार, लैंगिक शोषण आणि जबरदस्तीनं बंधक बनवून ठेवण्यासारखे आरोप करण्यात आले आहेत. या बहिणींमधील मोठ्या बहिणीनं आसाराम बापू विरोधात तर छोट्या बहिणीनं नारायण साईंना आरोपी म्हटलेलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 16:56