आसाराम बापूंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ Asaram to remain in jail till September 30

आसाराम बापूंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

आसाराम बापूंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप प्रकरणी कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीत आज वाढ करण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत त्यांना गजाआडच राहावं लागणार आहे. आसाराम बापूंसह त्यांचा सहकारी शिवाचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

जोधपूरहून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मनाई इथल्या आश्रमात आसाराम यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप १६ वर्षीय मुलीनं केला होता. त्यानंतर त्यांना इंदूर इथल्या आश्रमातून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

आसारामबापू हे सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेत आज त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आसारामबापूंनी राजस्थान हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावरही आज सुनावणी होणार आहे. आसारामबापूंच्या बाजूनं ज्येष्ठ वकील राम जेठमलानी केस लढणार आहेत.

दरम्यान, आसाराम यांच्या विरुद्धचे पुरावे भक्कम असून तपास योग्य दिशेनं सुरू असल्याची माहिती जोधपूर पोलिसांनी दिली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 16, 2013, 13:02


comments powered by Disqus