आसाराम बापूंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Last Updated: Monday, September 16, 2013, 13:02

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप प्रकरणी कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीत आज वाढ करण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत त्यांना गजाआडच राहावं लागणार आहे. आसाराम बापूंसह त्यांचा सहकारी शिवाचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

जामीनासाठी आसाराम बापूंची हायकोर्टाकडे धाव!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 11:04

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम बापू जामीनासाठी आता हायकोर्टात घेणार आहेत. जोधपूर कोर्टानं काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. आता उद्या ते हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

आसाराम बापूप्रकरणी कोर्टानं निकाल ठेवला राखून

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:17

आसाराम बापूच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झालीय. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आसाराम बापू आहे. मात्र, यावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्यामुळे बापूंना अजून तरी न्यायालयीन कोठडीतच राहावं लागेल, अशी शक्यता आहे.

असा कसा हा `आसाराम`?

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 09:28

आसाराम बापू आणि वाद हे जुनंच समिकरण आहे. कधी नेते-अधिकाऱ्यांना धमक्या दे, आपल्या भक्तांना लाथा-बुक्क्यांनी मार असली कृत्य आसाराम नेहमीच करत असतात. दुष्काळ असताना पाण्याची नासाडी करून वर त्याचं समर्थनही करतात.जिच्यावर बलात्कार झाला, तिचीच चूक आहे, असा संतापजनक दावाही त्यांनी केलाय.

आसाराम बापू संकटात, पोलिसांचं समन्स!

Last Updated: Monday, August 26, 2013, 09:24

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू संत आसाराम बापू अधिक संकटात सापडतांना दिसतायेत. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना चौकशीसाठी बोलावलंय.

आसाराम बापूंना होणार अटक!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:49

आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं आसाराम बापूंविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आसाराम बापूंना अटक होण्याची शक्यता आहे.

आसाराम बापू यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 12:53

आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात दिल्लीत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीतल्या कमला नगरमध्ये राहणाऱ्या जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं तक्रार केल्यावर, कमला मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही मुलगी आसाराम बापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती.