असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, Asimanand inquire of the complaint - Congress

असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू

असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असीमानंद यांचे सारे आरोप फेटाळलेत. संघ नेतृत्वाला बदनाम करण्याचे हे सरकारचेच राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप संघाचे नेते राम माधव यांनी केलाय. असीमानंद यांनी यापूर्वीच संघाचा या स्फोटांशी संबंध नसल्याचा न्यायालयात खुलासा केल्याचा दावाही माधव यांनी केलाय.तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, February 6, 2014, 18:23


comments powered by Disqus