LIVE कार्यक्रमात `त्यानं` स्वत:ला पेटवून नेत्याला मारली मिठी

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 17:56

लाईव्ह टीव्ही शो दरम्यान एका तरुणानं स्वत:ला पेटवून घेऊन बसपा नेत्याला मिठी मारली... ही धक्कादायक घटना घडलीय उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्ये...

लोकसभा निवडणूक : सपा, बसपाचे उमेदवार जाहीर

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:10

समाजवादी पार्टीने लोकसभेच्या २२ जागा राज्यात लढणार असून १३ उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीने (बसपा) शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे. कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू

Last Updated: Thursday, February 6, 2014, 18:43

असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

खासदाराच्या पत्नीकडून नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक

Last Updated: Saturday, November 9, 2013, 13:03

रेखाप्रमाणेच मीना हीदेखील धनंजयच्या पत्नी डॉ. जागृती हिच्या क्रूरतेची बळी ठरली होती. ‘जागृती नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक देते’ असा आरोप जागृतीवर करण्यात आलाय.

आमदाराच्या पत्नीची हत्या

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 20:23

उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे आमदार हाजी अलीम यांच्या पत्नीची आज सकाळी दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. चाकूसारख्या धारदार शस्त्राने ही हत्या केली गेल्याची शंका व्यक्त होत आहे.

‘वंदे मातरम्’ इस्लामविरोधी; माफी मागणार नाही!

Last Updated: Friday, May 10, 2013, 14:43

संसदेत ‘वंदे मातरम्’चा घोर अवमान करणारे बसपाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ हे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे.

‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:08

लोकसभेत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्या झाल्या बसपा खासदार शफीकुर्र रेहमान बर्क यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.

चारित्रहिन बापाची मुलानंच दिली होती सुपारी...

Last Updated: Friday, April 12, 2013, 13:29

बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भारद्वाज यांचा छोटा मुलगा नितेश याला अटक केलीय. संपूर्ण रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर अखेर नितेशनं आपला गुन्हा कबूल केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

फेसबुकवरच्या ‘विचित्र योगी’च्या पोलीस शोधात

Last Updated: Friday, April 5, 2013, 16:56

बसपाचे अरबपती नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. या प्रकरणात स्वामी प्रतिमानंद यांचं नाव पुढे येत असून पोलीस स्वामींच्या शोधात आहेत.

यमदूत बिल्डर शेख - कुरेशी अद्यापही फरार!

Last Updated: Saturday, April 6, 2013, 07:05

ठाणे इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डर सलीम शेखला अटक करण्यात पोलिसांना आणि क्राईम ब्रान्चला यश आलाय. अनधिकृत आणि कमकुवत बांधकाम करणाऱ्या सलीम शेखची अटक ही या प्रकरणातील पहिलीच अटक आहे..

दीपक भारद्वाज हत्येसाठी दोन करोडची सुपारी!

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 12:38

अरबपती बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात आता महत्त्वाचा खुलासा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक यांच्या हत्येसाठी दोन करोड रुपयांची सुपारी दिली गेली होती.

दिल्लीत बसपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 15:24

पश्चिम दिल्लीत बहुजन समाजवादी पक्षा एका स्थानिक नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. तर मेट्रो स्टेशनवर एका महिलेची गोळाबार करून हत्या करण्यात आल्याने दिल्ली हादरलीय आहे.

महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती

Last Updated: Sunday, February 17, 2013, 16:15

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.

राज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर

Last Updated: Friday, December 7, 2012, 13:13

लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याचं सपानं स्पष्ट केलंय. यामुळे एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार पास होणार हे नक्की झालंय.

`मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेतः बसप

Last Updated: Monday, October 22, 2012, 15:38

मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.

मायावतींच्या चौपट अखिलेश यादवचा पार्क

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 05:12

मायावतींना बनवलेल्या पार्कमधील मोकळ्या जागेत हॉस्पिटल बनवण्याचं अश्वासन देणारे समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता समाजवादी पार्टीचे नेते जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

मायावतीनंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड

Last Updated: Saturday, July 28, 2012, 16:41

उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आलीय.

बसपा कार्यकर्त्यांचा राडा

Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:27

चंद्रपूर येथे आयोजित बसपा कार्यकर्त्यांच्या सभेत आज तुंबळ युद्ध झाले. या सभेत जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीविरूध्द नाराज कार्यकर्त्यांनी बसपा प्रदेश अध्यक्ष विलास गरुड आणि अन्य नेत्यांना बेदम मारहाण केली. अखेर पोलीस संरक्षणात या सर्व नेत्यांना सुरक्षित स्थळी न्यावे लागले.

का अटली मतदारांची 'माया'?

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 10:59

‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.

नागपुरात विलास गरुडांना मारहाण

Last Updated: Monday, February 27, 2012, 19:07

गपुरात बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांना मारहाण करण्यात आलीये. बसपाच्या कार्यकर्त्यांनीच गरुड यांना मारहाण केलीये. महापालिका निवडणुकीत तिकीट विकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचार समाप्ती

Last Updated: Monday, February 6, 2012, 11:29

राजकीय दृष्ट्य सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार समाप्ती होणार आहे.

हत्तींवर पडदा, दलित विरोधी!

Last Updated: Monday, January 16, 2012, 09:18

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी निवडणूक आयोगाच्या पुतळे झाकण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई सरकारच्या दबावाखाली असून हा आदेश म्हणजे दलित विरोधी मोहीम असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.

मायावतींच्या वाढदिवशी बसपाची यादी जाहीर

Last Updated: Sunday, January 15, 2012, 14:16

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या ५६ व्या वाढदिवशी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीच्या ४०३ उमेदवारांची यादी जाहीर केली.