Last Updated: Thursday, February 20, 2014, 13:43
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय.
तसंच एकादं सरकार दहशतवाद्यांना कसं पाठिशी घालू शकतं असा सवालही पंतप्रधानांनी केलाय. माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या म्हणजे देशाच्य़ा आत्म्यावर घाला असल्याचं मनंमोहन सिंग यांनी नमूद केलंय.
सुप्रीम कोर्टानं राजीव गांधींच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याचा निर्णय दिलाय. त्यानंतर लगेचच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दोषींच्या सुटकेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून तीन दिवसांत सर्वांची सुटका करण्याच निर्णय घेतलाय. त्यावरून आता केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये जुंपलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 20, 2014, 13:43