Last Updated: Sunday, May 25, 2014, 16:10
www.24taas.com, झी मीडिया, हैदराबादजर तुमचा आत्मविश्वास उदंड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची आदिवासी मुलगी पूर्णा... पूर्णा 13 वर्ष 11 महिने वयाची आहे आणि तिनं जगातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी म्हणून नाव नोंदवलंय.
जगातील सर्वात उंच पर्वत शिखर म्हणजे एव्हरेस्ट... याच एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकवणारी पूर्णा निजामाबाद जिल्ह्यातील राहणारी एका मजूराची मुलगी आहे. ती 9 व्या वर्गात शिकते.
एव्हरेस्ट सर करण्याच्या या मिशनमध्ये पूर्णासोबत 9व्या वर्गातील विद्यार्थिनी साधनापल्ली आनंदही सोबत होती. ही विद्यार्थिनी खम्मम जिल्ह्यात राहणारी सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची मुलगी आहे.
पूर्णा आणि आनंद दोघीही आंध्र प्रदेश समाज कल्याण शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत. या दोघींनी 52 दिवसांचा लंबा प्रवास करत आज सकाळी सहा वाजता एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवलं. या दरम्यान पूर्णा एव्हरेस्ट सर करणारी जगातील सर्वात कमी वयाची महिला गिर्यारोहक बनलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 25, 2014, 16:10