एव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची मुलगी पूर्णा!

Last Updated: Sunday, May 25, 2014, 16:10

जर तुमचा आत्मविश्वास उदंड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची आदिवासी मुलगी पूर्णा... पूर्णा 13 वर्ष 11 महिने वयाची आहे आणि तिनं जगातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी म्हणून नाव नोंदवलंय.

पाय गमावल्यानंतरही तिने जिद्दीने ‘एव्हरेस्ट’ सर केले

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 17:03

साखळीचोराला विरोध केल्यामुळे चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलेल्या २५ वर्षीय अरुणिमा सिन्हाने उजवा पाय गमावूनही जिद्दीने सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट सर केले आणि स्वत:सह भारताचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले.

...आणि 'लोत्झे-एव्हरेस्ट' मोहीम फत्ते झाली!

Last Updated: Friday, May 17, 2013, 20:52

माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोत्झे या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केलीय पुणेकरांनी....

एव्हरेस्ट सर करणारे बहाद्दर मनपाच्या विस्मृतीत

Last Updated: Friday, October 12, 2012, 13:31

ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.

‘त्या’ साहसवीरांचं धाडस दृश्यरुपात...

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 07:54

पुण्याच्या गिरी प्रेमी संस्थेच्या बारा वीरांनी १९ मे २०१२ ला एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणेकरांचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आला. पण ही मोहीम यशस्वी करतानाचा थरार प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे एका डॉक्युमेंटरीच्या रुपानं...

‘एव्हरेस्ट’वीरांचं उत्साहात स्वागत

Last Updated: Sunday, June 3, 2012, 15:05

पुण्याच्या आणि पिंपरी-चिंचवडच्या काही उमद्या तरुणांनी नुकताच एव्हरेस्ट सर करून एव्हरेस्टवर मराठमोळा झेंडा रोवला. यानंतर आज गिरीप्रेमी संस्थेचे हे तरुण पुण्यात दाखल झालेत. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

मराठमोळे मावळे एव्हरेस्टवर

Last Updated: Saturday, May 19, 2012, 10:17

काही दिवसांपूर्वी हिमालय सर करण्यासाठी निघालेले मराठमोळे मावळे अत्युच्च शिखर एव्हरेस्टजवळ पोहचलेत. त्यापैकी दोघांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले आहे. त्यांनी भगवा झेंडा एव्हरेस्टवर फडकविला आहे.

शिवाजी महाराजांची स्वारी एव्हरेस्टवर

Last Updated: Monday, April 23, 2012, 11:35

महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी अभूतपूर्व घटना नुकतीच हिमालयातील माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षेप (उंची १७000 फूट) या ठिकाणी घडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी एव्हरेस्ट सर केले. यासाठी पुणे करांनी पुढाकार घेतल्याने ते शक्य झाले.

शिवरायांची 'एव्हरेस्ट' स्वारी

Last Updated: Sunday, January 22, 2012, 13:09

एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं १६ मार्चला २० जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत गिरीप्रेमींचं पथक शिवरायांचा पुतळा विराजमान करणार आहेत.

एव्हरेस्टवरही इंटरनेटची चढाई

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 18:21

नेपाळच्या हिमालय पर्वतराजीत जगातला सर्वाधिक उंचीवरचा वेबकॅम बसवण्यात आला आहे. हवामान बदलांचा एव्हरेस्टवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना या वेबकॅममुळे थेट प्रतिमा उपलब्ध होतात. एव्हरेस्टसमोर असलेल्या काला पथ्थर या छोट्या डोंगरावर हा सौर उर्जेवर चालणारा वेबकॅम बसवण्यात आला आहे.