जम्मूमध्ये पाकिस्तानी कैद्यावर प्राणघातक हल्ला! Attack on Pakistani prisoner in Jammu

जम्मूमध्ये पाकिस्तानी कैद्यावर प्राणघातक हल्ला!

जम्मूमध्ये पाकिस्तानी कैद्यावर प्राणघातक हल्ला!
www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर

जम्मूमध्ये कोट बलावल जेलमध्ये हाणामारी झालीये. यात सनाउल्लाह हा पाकिस्तानी कैदी गंभीर जखमी झालाय. त्याला ICUमध्ये दाखल करण्यात आलंय... पाकिस्तानात सरबजीतवर झालेल्या हल्ल्याची ही प्रतिक्रिया आहे का, अशी शंका व्यक्त केली जातेय... याबाबत पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून घटनेचे तपशील मागवलेत. तसंच उपचारांसाठी सनाउल्लाहला पाकिस्तानात पाठवण्यात यावं, अशी मागणी पाक सरकारने केली आहे.

पाकिस्तानी नागरिक असणारा सनाउल्लाह गेली १७ वर्षं भारतीय कैदेत आहे. सनाउल्लाहवर जम्मूच्या जेलमध्ये हातोड्याने हल्ला करण्यात आला. खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असणाऱ्या एका माजी सैनिकानेच सनाउल्लाहवर वार केल्याचं सांगण्यात येत आहे. सनाउल्लाहची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला चंडिगढच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. सनाउल्लाह कोमात गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो सध्या आयसीयूमध्ये आहे.



यासंदर्भात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून सांगितलं आहे, की भारतात अशा हल्ल्यांची चौकशी होते. पाकिस्तानात तशी चौकशीही केली जात नाही. या प्रकरणी जम्मू सरकारतुरुंग अधीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यांच्याही चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

First Published: Friday, May 3, 2013, 16:30


comments powered by Disqus