सनाउल्लाहच्या सुटकेसाठीही काटजूंचं अपील Katju Appeals for Sanaullah

सनाउल्लाहच्या सुटकेसाठीही काटजूंचं अपील

सनाउल्लाहच्या सुटकेसाठीही काटजूंचं अपील
www.24taas.com, नवी दिल्ली

भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहच्या सुटकेची मागणी केली आहे. जम्मूच्या जेलमध्ये पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहवर भारतीय कैद्याने हल्ला केला होता. त्यात सनाउल्लाह गंभीर जखमी झाला आहे.

“मी भारत सरकारला अपील करतो, की त्यांनी जम्मू जेलमध्ये हल्ला झालेल्या आणि सध्या कोमात गेल्याचं सांगण्यात येणाऱ्या पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहला पाकिस्तान सरकरच्या मागणीनुसार त्यांच्याकडे सोपवण्यात यावं. भारताने सनाउल्लाह प्रकरणी माणुसकी दाखवावी.” अशी मागणी काटजू यांनी केली आहे.

मार्कंडेय काटजू यांनी यापूर्वी संजय दत्तच्या सुटकेसाठीही मागणी केली होती. भारतीय कैदी सरबजीत याची पाकिस्तानात हत्या करण्यात आल्यावर त्याचाच बदला म्हणून भारतीय कैद्याने पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह याच्यावर हातोड्याने वार केल्याचं सांगण्यात येत आहे.

First Published: Sunday, May 5, 2013, 16:30


comments powered by Disqus