मामीनेच अल्पवयीन भाच्यांना वेश्या व्यवसायात ओढले, aunt had been Prostitution disclosed, reports on

मामीनेच अल्पवयीन भाच्यांना वेश्या व्यवसायात ओढले

मामीनेच अल्पवयीन भाच्यांना वेश्या व्यवसायात ओढले
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

प्रेमाचे शहर म्हणून ओळखणाऱ्या आग्रा शहरात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. दोन अल्पवयीन भाच्यांना मामीने चक्क वेश्या व्यवसाय ओढले. ही बाब उघड होतात या महिलेला नातेवाईकांने चोप चोप चोपले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दोन अल्वयीन मुलींना वेश्या व्यवसायत ढकल्याच्या कारणावरून या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. 15 वर्षीय हिमानी आणि किमानी (दोन्ही नावे बदलेली आहेत.) यांची मेडिकल करण्यात येणार आहे. हिमानी ही पाचवी आणि किमानी ही चौथी इयत्तेत शिकत आहेत. या दोन्ही मुली ज्या ठिकाणी राहत आहेत. त्याच परिसरात त्यांची मामी राहते. या दोन्ही अल्पवयीन मुलींनी कोणत्याना कोणत्या तरी बहाण्याने मामी घरी नेत असे. त्यांनी सायंकाळी घरी सोडत असे.

मात्र, हा प्रकार लोकांना संशायस्पद वाटत होता. मंगळवारी दुपारी या मुलींच्या मोठ्या भावाला मामीच्या घरी पाठविण्यात आले. मात्र, मामी घराबाहेर बसलेली होती. माझ्या दोन बहिणी कुठे आहेत, असे भावाने मामीला विचारले. परंतु मामीने उडावा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे भावाचा संशय आला. त्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी वाईट अवस्थेत दोन्ही बहिणी नको त्या अवस्थेत काही युवकांसोबत आढळून आल्यात. यावेळी मामीने त्या युवकांच्या मदतीने मुलींच्या भावाला मारहाण केली.

या बातमी कळताच रात्री मामीच्या घरी काही नातेवाईक गेलेत. त्यांनी तिची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर मामीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 22:48


comments powered by Disqus