Last Updated: Wednesday, June 12, 2013, 13:02
www.24taas.com, झी मीडिया, पटियाला जम्मू जेलमध्ये बंदिस्त असलेल्या पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह याची हत्या करणाऱ्या भारतीय कैद्याला बक्षीस जाहीर केलं गेलंय. उत्तर प्रदेशमधल्या ‘शिवसेना हिंदुस्तान’ पक्षानं त्याला एक लाख रुपये देऊन त्याचा एकप्रकारे गौरवच केलाय.
पाकिस्तानातील काही कैद्यांनी सरबजीतची हत्या केल्यानंतर काही दिवसांनी जम्मू जेलमध्ये बंदिस्त असलेल्या पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह याची हत्या करण्यात आली होती. भारतीय कैदी असलेल्या विनोद कुमार याच्यावर सनाउल्लाहच्या हत्येचा आरोप आहे. ‘शिवसेना हिंदुस्तान’नं विनोद कुमारच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये देऊन त्यांना सन्मानित केलंय.
मंगळवारी पटियालामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन कुमार गुप्ता यांनी विनोद कुमारबद्दल गौरवौद्गार काढलेत. ‘सरबजीतच्या हत्येचा बदला घेऊन विनोद कुमारनं गौरवास्पद काम केलंय’ असं गुप्ता यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी विनोद कुमार याची पत्नी मंजू देवी आणि मेव्हणा जी. एस. रोहतेला यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 12, 2013, 12:59