अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक, Ayodhya yatra: VHP`s Ashok Singhal arrested

अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक

अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक
www.24taas.com , झी मीडिया, लखनऊ

विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक करण्यात आलीय. परिक्रमा यात्रेसाठी ते फैजाबादला जाण्यासाठी निघाले असता अमौसी विमानतळावर अटक केली. त्याआधी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत असतांना “या देशात हिंदू असणं हा गुन्हा आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला होता.

जर तुम्ही फैजाबादला जाण्यासाठी निघालात, तर तुम्हाला अटक होईल, असं सिंघल यांना दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत विचारलं असता, सिंघल यांना राग अनावर झाला आणि ते म्हणाले, “आम्ही अटक करुन घ्यायला तयार आहोत, मात्र मी सरकारला विचारु इच्छितो की, आम्हाला कोणत्या गुन्ह्यासाठी अटक करणार, या देशात हिंदू असणं गुन्हा आहे का? या देशात रामभक्त असणं गुन्हा आहे का?”.

सिंघल म्हणाले, “माझा देव मर्यादा पुरुषोत्तम राम तंबूमध्ये राहिलेत. ते आता तिथं राहणार नाहीत. त्यांच्यासाठी मोठं मंदिर बांधायला हवं”. उत्तरप्रदेशचे मंत्री आजम खान यांच्या तालावरच उत्तरप्रदेश सरकार काम करतं का? असा टोलाही सिंघल यांनी उत्तरप्रदेश सरकारला लगावला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, August 25, 2013, 11:07


comments powered by Disqus