बंगळुरू स्फोट : तिघा संशयितांना अटक, Bangalore blast: Three people arrested in Chennai

बंगळुरू स्फोट : तिघा संशयितांना अटक

बंगळुरू स्फोट : तिघा संशयितांना अटक
www.24taas.com,बंगळूरू

बंगळुरूमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर झालेल्या शक्तिशाली स्फोट प्रकरणी आज तिघांना तमिळनाडूतील चेन्नईतून अटक करण्यात आली आहे.

मल्लेश्वरम भागात जगन्नाथ भवनाजवळ व्हॅन आणि मोटारीच्यामध्ये उभ्या करून ठेवलेल्या मोटारसायकलमध्ये झालेल्या या स्फोटात १६जण जखमी झाले होते. त्यात ११ पोलिसांचा समावेश होता.

या स्फोटप्रकरणा कर्नाटक आणि तमिळनाडू पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत सोमवारी रात्री पीर मोहसीन आणि बशीर यांना अटक केली. तर आज सकाळी किचेन बुहारी याला ताब्यात घेण्यात आले.

या स्फोटाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने बिहारमधील दरभंगा आणि समस्तीपूर येथे छापे टाकले होते. त्यांच्या हाती काही धागेदोरे सापडले आहेत का, याची माहिती मिळू शकलेली नाही.

First Published: Tuesday, April 23, 2013, 12:23


comments powered by Disqus