Last Updated: Thursday, April 11, 2013, 13:11
www.24taas.com,नवी दिल्लीगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली आहे. कालच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत काल दिल्लीत राजनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक पार पडली. या बैठकीला रामलाल आणि नितीन गडकरी हे उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याचा वाद दिल्लीतून महाराष्ट्रात आणि आता महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचला होता. त्यामुळे कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते.
विदर्भातल्या सुधीर मुनगंटीवार यांना नितीन गडकरींचं पाठबळ असलं तरी गोपीनाथ मुंडेंनी मात्र त्यांच्या नावाला टोकाचा विरोध केलाय. मुनगंटीवारांची निवड झाल्यास प्रसंगी निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा मुंडेंनी दिल्याचं वृत्त होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
First Published: Thursday, April 11, 2013, 13:11