Last Updated: Tuesday, June 17, 2014, 16:04
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्लीउत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.
काँग्रेसनं नियुक्त केलेले सहा राज्यपाल बदलले जाण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात नियुक्त झालेले राज्यपाल बदलून त्यांच्याजागी नवे राज्यपाल आणले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, केरळच्या राज्यपाल शिला दिक्षीत, नागालँडचे राज्यपाल अश्वीनी कुमार, पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन, छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त, यांना बदललं जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे संभाव्य उमेदवार - व्ही.के.मल्होत्रा
- कल्याण सिंह
- लालजी टंडन
- राम नाईक
- यशवंत सिन्हा
- कैलास जोशी
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 17, 2014, 15:55