Last Updated: Monday, July 29, 2013, 07:36
www.24taas.com, झी मीडिया, गुवाहाटीगुवाहाटीतल्या रेल्वे स्थानकानजीकच्या गजबजलेल्या फलटन बाजारात पोलीस स्टेशनच्या बाहेर झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उल्फा बंडखोरांच्या समर्थकांकडून हा स्फोट घडवण्यात आल्याचा संशय आहे. जखमीमध्ये दोन पोलिस आणि होमगार्डच्या दोन जवानांचा समावेश आहे.
जखमींना गुवाहाटीतल्या जीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आलय जी एस रोडवर पोलिस वाहन चेक करत असतांना हा स्फोट झाला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, July 28, 2013, 23:56