महिलां बरोबर बोलतानाही वाटते भीती - फारुक अब्दुल्ला, Bolatanahi in women feel fear - Farooq Abdullah

महिलांशी बोलतानाही वाटते भीती - फारुक अब्दुल्ला

महिलांशी बोलतानाही वाटते भीती - फारुक अब्दुल्ला
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला चर्चेत आणले आहे. फारुक यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात म्हटले की, आताच्या परिस्थितीत महिलांबरोबर बोलताना ही भीती वाटते. सध्या अशी परिस्थिती आहे की महिलां पीए ठेवण्यास भीती वाटते. यावरच ते न थांबता पुढे म्हणाले की, मी विचार केला आहे. महिला पीए ठेऊन मी स्वतःच जेलमध्ये नको जायला म्हणून महिला पीए ठेवत नाही.

मी यावेळी महिला किंवा मुलींवर कोणत्याही प्रकारचा दोष लावत नाही. परंतु, आज समाजाची स्थिती ही अशीच झाली आहे. दरम्यान फारुक अब्दुल्ला यांनी या केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागीतली.

असेच वादग्रस्त विधान या आधी ही समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खाजदार नरेश आग्रवाल यांनी ही केले होते. ते म्हणाले होते की, ज्या वेळी महिलांच्या छळणूकीला थांबवण्यासाठी कायदे तयार करण्यात येत होते तेव्हा मी बोलो होतो, बलात्कारविरोधी बिलामुळे मोठ्या पदावरील अधिकारी हे महिलांना नोकरीवर ठेवण्यास घाबरतील. मला माहिती आहे की, बहुतेक अधिकारी हे महिला पीए ठेवण्यास घाबरतात. ते पुढे म्हणाले की, लोक ही महिलांना कामावर ठेवण्यासाठी यामुळे घाबरतात की कुठे कसे आणि केव्हा ही त्यांच्यावर खोटे आरोप लावले जातील.

पाहा लाइव्ह स्कोअर



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 6, 2013, 14:12


comments powered by Disqus