`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`, Book those responsible for killing soldiers - manmohan singh

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`
www.24taas.com, नवी दिल्ली

पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अजूनही आशा आहे, की पाकिस्तान आपली चूक मान्य करेल आणि या घटनेच्या जबाबदारीचा स्वीकार करेल. याचसोबत ‘ज्यांनीदेखील भारताच्या जवानांची हत्या करून अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांचे शिर धडावेगळे केले त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवणं भारताला शक्य होणार नाही’, असं पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

८ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या आत घुसून दोन भारतीय जवानांची हत्या केली होती तसंच या दोन जवानांचे शिरही धडावेगळे करण्यात आले होते. त्यातील एका जवानाचं शिर अजूनही भारताला मिळालेलं नाही. यानंतर संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

First Published: Tuesday, January 15, 2013, 17:23


comments powered by Disqus