केरन सेक्टरमध्ये अतिरेक्यांची युद्धाची तयारी

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:38

भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्ताने अतिरेक्यांशी हात मिळवणी केल्याचे भारत-पाक सीमेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला आहे. पकडण्यात आलेला सर्व शस्त्रसाठा युद्धादरम्यान वापरण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

Last Updated: Thursday, October 3, 2013, 14:16

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

पाकच्या नापाक कारवाया सुरुच

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:17

पाकच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाक सैन्याकडून रात्रीपासून पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे.

पुन्हा हल्ला; बीएसएफ जवान गंभीर जखमी

Last Updated: Monday, August 12, 2013, 09:11

मुजोर पाकिस्तानी सैन्यानं रविवारी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या सीमेवर तसंच पूँछ भागातील बालकोट-मेंढरमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय.

भारतीय लष्कर चौकीवर पाककडून गोळीबार

Last Updated: Saturday, July 27, 2013, 15:31

जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराच्या छावणीवर गोळीबार पाकिस्तानने गोळीबार केला. पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आलेय.

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 17:23

पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

पाच वर्षांच्या मुलानं दिला शहीद हेमराजला मुखाग्नि!

Last Updated: Thursday, January 10, 2013, 09:46

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्स नायक हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय जवानाचे शिर कापून पाकिस्तानी सैनिकांनी नेले

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 11:23

पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य काल पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.