`किस` करणं, ठरलं `जीवघेणं` Boy lost his life because of `kiss`

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`
www.24taas.com, बिजनौर

आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा किस घेणं बिजनौरच्या एका आशिकाला चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

बिजनौर येथील तिगरी मानका गावातील शेतकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीवर २२ वर्षीय मोहम्मद आफाक याचं एकतर्फी प्रेम होतं. हिच गोष्ट तिला सांगण्यासाठी तो गुरुवारी तिवडी येथे जाणाऱ्या बसमध्ये आपला मित्र सोनू याच्यासह चढला. या बसमध्ये शेतकी महाविद्यालयात जाणाऱ्या अनेक मुली बसल्या होत्या. यातच आफाकचं ज्या मुलीवर प्रेम होतं, ती मुलगीही होती. चालू बसमध्येच पुढे सरकत आफाकने त्या मुलीसमोर आपल्या मनातील प्रेम उघड केलं आणि तिला जबरदस्तीने ‘किस’ केलं.


या गोष्टीने घाबरून जात त्या मुलीने ओरडण्यास सुरूवात केली. त्यामुळे बसचालक अलीम अहमद गोंधळून गेला. बसमधील प्रवाशांनीही गोंगाट केल्यामुळे आफाकने घाबरून जात धावत्या बसच्या खिडकीतून उडी मारली. मात्र तो बसच्या मागील चाकाखाली आला. तेथेच तो गंभीर जखमी झाला. बसचालक आणि प्रवाशांनीच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आफाकला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आफाकचा मित्र सोनू मात्र घटनास्थळावरून गायब झाला.

First Published: Friday, March 1, 2013, 16:29


comments powered by Disqus